दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ
कल्याण : ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण पूर्व विजयनगर परिसरात करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने, शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत, शिवसेना संपर्कप्रमुख, निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी 2 कोटी निधी उपलब्ध करून आणला. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे रविवारी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
पोहच रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणी योजना अश्या अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून, आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले.
यावेळेस शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर, संतोष साळवी, अनंत आंब्रे, विभाग संघटक प्रशांत मांजरेकर, दिलीप कोल्हे, विशाल विरा, विभाग समन्वयक महेंद एटमे, उपविभाग प्रमुख संभाजी माने, भगवान सोंडकर, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, प्रदीप तांबे, उपशाखाप्रमुख विकास गुरव, अतुल वाघमारे, सुरेंद्र मोरे, प्रमोद लाड, अमर मलाह, नंदकिशोर सुरकुतवार, राजाराम पठारे, साहेबराव आहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
00000