ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व याँनच्या विशेष निधितून खासदार नरेश म्हस्के, आमदार  रविन्द्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने कोपरीतील प्रभाग क्रमांक २० मधील लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. लोकनेते रमाकांत पाटील आणि माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने ४० वर्षे जुन्या असलेल्या या व्यायामशाळेच्या नविन वास्तूच्या शुभारंभांच्या कामाचा प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला.
यावेळी रमाकांत पाटील म्हणाले, मागील तीन ते चार वर्षांपासून व्यायामशाळेचे नूतनीकरण करण्याचा पाठपुरावा सुरु होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्याने लकी व्यायामशाळेची नवीन वास्तू लवकरच उभी राहील. नव्याने उभ्या राहणाऱ्या लकी व्यायामशाळेचा फायदा स्थानिक युवकांप्रमाणे महिलांना देखील होणार असून महिलांसाठी योगाभ्यासाचे वर्ग येथे सुरु करणार असल्याचे कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्र संघटिका आणि माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी उपविभाग प्रमूख हेमंत राऊत, राजू शेलार, रेखा नलावडे, शाखाप्रमुख संतोष पांचाळ, नेहा मानकामे, तेजस दळवी, उपशाखाप्रमुख अभिषेक इंगळे, जितू शेलार, रोझर सिक्वेरा, संपदा दळवी, जेष्ठ शिवसैनिक एकनाथ काळे, प्रमोद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजक लकी व्यायाम शाळा ने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *