ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले.
मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले.
सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.
समारोप करताना केलेली समूह नृत्ये तर डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शेवटी म्हटलेले रामगीत सर्वांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेले.
एवढा मोठा कार्यक्रम करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी घेतलेले कष्ट आणि मेहनत कौतुकास्पद आहे. डॉ. संतोष कामेरकर स्वत: जातीने सर्व गोष्टीत लक्ष देत होते. संजय भाट, विष्णू सातवसे, दीपक मेजारी, तेलवणे मॅडम, चंद्रकांत खाडये, मनोज आंग्रे, राज साडविलकर, संजीव  शिरसाट, राजेंद्र खाडये, संजीव शिरसाट इत्यादींचे योगदान मोठं आहे. हे सर्वजण स्वतचा व्यवसाय सांभाळून या गोष्टीसाठी वेळ देत होते. तसेच वेळ देणाऱ्या व आर्थिक सहकार्य करणाऱ्या   सर्वाचे मनापासून कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
भविष्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम होऊन वैश्य समाज एकत्र येऊन या समाजाचा विकास व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून या कार्यक्रमाची सांगता झाली.  वैश्य ग्लोबल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *