मुंबई : मुंबई शालेय क्रीडा असोसिएशन आयोजित ८२ व्या आंतर शालेय कबड्डी स्पर्धेत शालेय संघटनेस संलग्न ४२ संघांनी सहभाग घेतला. आझाद मैदान येथे आयोजित या स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने त्यांनी मुलींच्या १४ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकावले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात चेंबूर येथील स्वामी विवेकानंद शाळेने तर १६ वर्षाखालील मुलांच्या गटात दादरच्या ,डॉ अँटोनी डिसिल्वा शाळेने विजेतेपदाचा मान मिळवला. १६ वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात ग्रँट रोड च्या क्वीन मेरी ने मालाडच्या सेंट एंनस स्कूलचा २ गुणांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला. विजयी संघाच्या प्रिशा परमारने शानदार अष्टपैलू खेळ केला. तिला हीर भावसार ची सुरेख साथ मिळाली. पराभूत संघाच्या चैताली भादिकर ची लढत एकाकी ठरली. १४ वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना डॉ आंबेडकर व श्री चंदुलाल नानावटी विद्यालय,विलेपार्ले या दोन संघात रंगला. त्यात आंबेडकर संघाने 08गुणांनी सहज पराभव केला. संघाच्या विजयात ध्वनी लाड च्या अचूक पकडी व श्रावणी पवार चा अष्टपैलू खेळ निर्णायक ठरला. १६ वर्षाखालील मुलांच्या गटाचे जेतेपद मिळवताना डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल दादर ने सेंट आंन्स , मालाड चा ५६-२९ गुणांनी दणदणीत पराभव केला. विजयी संघाच्या तनिष पंगमने चढाईत १७ गडी बाद करून खेळाची छाप पाडली. त्याला अनुज चौगुलेने सफाईदार पकडी करून चांगली साथ दिली. १४ वर्षाखालील मुलांचे विजेतेपद स्वामी विवेकानंद ने पटकावले. त्यांनी दादरच्या डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूलला नमविले. रुद्र व मयुरेश गायकवाड विजयाचे शिल्पकार ठरले त्यांनी यज्ञेश एकांडे च्या २१ गुणाच्या चढाया निस्फळ ठरवून ५३-३५ असा विजय मिळवला
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
प्रमुख अतिथी सौ वीणा खवळे शेलटकर, श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी खेळाडू,शालेय संघटनेचे अध्यक्ष फादर ज्युड रॉड्रिग्ज, सचिव एझमेरो फिग्रेडो सौ सारा अल्पंनसो, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सदस्य राजाराम पवार, राम अहिवले, रविन्द्र विसपुते यांच्या हस्ते संपन्न झाला. एम एस एस एस भारतीय खेल, सचिव दीपक शिंदे व खेळ उपसमिती सदस्य श्री रवींद्र विसपुते यानी या स्पर्धा आयोजनात मोलाची जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१६ वर्षा खालील मुले (डॉ. व्ही डी घटे चॅलेंज शिल्ड)
१ डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, दादर
२ सेंट आंन्स हायस्कूल , मालाड
३ स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर
१६ वर्षा खालील मुली (श्रीमती सरस्वतीबाई मंत्री शिल्ड)
१ क्वीन मेरी स्कूल, ग्रँट रोड
२ सेंट आंन्स हायस्कूल , मालाड
३ होली क्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूल, मिरा रोड
१४ वर्षा खालील मुले (श्री बालमोहन शिल्ड)
१ स्वामी विवेकानंद हायस्कूल, चेंबूर
२ डॉ अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, दादर
३ आर्यन एज्युकेशन सोसायटी, गिरगाव
१४ वर्षा खालील मुली
१ डॉ. बाबासाहेब आबेडकर विद्यालय, विक्रोळी
२ श्री चंदुलाल नानावटी हायस्कूल, विलेपार्ले
३ नालंदा पब्लिक स्कूल, मुलुंड
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *