अरविंद जोशी
मिरा-भाईंदर : निवडणुकीनंतर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे असा आरोप करत आज मनसेने प्रभाग क्रमांक 4 मध्ये ठिय्या आंदोलन केले. महापालिकेतील आयुक्तासह इतर अधिकाऱ्यांवर मनसेने गंभीर आरोप केले.
गेले साडे तीन महिने पत्र व्यवहार करून सुद्धा महापालिकेचे अधिकारी जागे होतं नाहीत असं म्हणत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. अनधिकृत बांधकामच्या स्वरूपाबद्दल बोलताना लॉजिंग, बार अशी बरीच कामं होतं असल्याचे त्यांनी सांगितले. तिथून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना याचा त्रास होऊ शकतो असं ते म्हणाले.
महापालिका अधिकार्यानी 31 जानेवारी पर्यंतची वेळ घेत, तसेच त्याचे निवेदन स्वीकारत आंदोलन स्थगित करायला सांगितले.
अनधिकृत बांधकामावर कारवाई होते का तसेच या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते का ते लवकरच कळेल.
0000
