कल्याण : कल्याण स्टेशन जवळील दत्त मंदिर परिसरातील एका बिल्डिंग मध्ये रात्री 3 वाजता साप शिरल्याने लोकांनी वॉर फॉउंडेशनचे सर्प मित्र सतीश बोबडे यांना संपर्क केला तेव्हा सतीश बोबडे व साहस बोबडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापाचा सुखरूप बचाव केला.
बचाव केलेला सर्प हा मांजऱ्या जातीचा असून कल्याण सारख्या रहदारीच्या ठिकाणी हा सर्प भेटल्याने सतीश बोबडे यांनी आश्चर्य व्यक्त केले. हा सर्प अनेक वर्षांनंतर मिळाला आहें. बचाव केलेला सर्प वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निसर्गमुक्त करण्यात येईल असे सर्प मित्र सतीश बोबडे यांनी सांगितले.
0000
