पर्यायी इंधनाचा शोध आणि वापर या दोहोंचीही गरज जग मान्य करत असताना भारतही मागे राहिलेला नाही. सौरऊर्जेचा वाढता वापर आणि त्याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मिळणारे यश हीच बाब दर्शवते. नुकतीच भारतातील पहिली सोलर कार ‌‘वायवे ईवा‌’ ऑटो एक्स्पो 2025 मध्ये लाँच करण्यात आली. ‌‘वायवे ईवा‌’ची कमत बॅटरीसह 3.99 लाख रुपये आणि बॅटरी सबस्क्रिप्शनसह 3.25 लाख रुपये इतकी (एक्स-शोरूम) आहे. बॅटरी सबस्क्रिप्शन पर्यायाअंतर्गत, ग्राहक कारची बॅटरी भाड्याने घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना बॅटरीची देखभाल तसेच बदलण्याची काळजी करण्याची गरज नाही. या चारचाकीचे प्री-बुकगदेखील सुरू झाले आहे. पुढील वर्षीपासून ही गाडी ग्राहकांच्या दारात उभी राहिलेली दिसू शकेल. सुरू होईल.
प्रकार आणि कमत
ही कार तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक नोव्हा, स्टेला आणि वेगा यातून आवडते मॉडेल खरेदी करु शकतात.
* नोव्हा – बॅटरी रेंटल प्लॅनसह 3.25 लाख रुपये आणि सबस्क्रिप्शनशिवाय 3.99 लाख रुपये.
* स्टेला – बॅटरी रेंटल प्लॅनसह 3.99 लाख रुपये आणि सबस्क्रिप्शनशिवाय 4.99 लाख रुपये.
* वेगा – बॅटरी रेंटल प्लॅनसह 4.49 लाख रुपये आणि सबस्क्रिप्शनशिवाय 5.99 लाख रुपये.
अशी आहे बांधणी
या सोलर कारची लांबी 3,060 मिमी, रुंदी 1,150 मिमी आणि उंची 1,590 मिमी आहे. तिचा व्हीलबेस 2,200 मिमी इतका आहे. ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
‌‘वायवे ईवा‌’मध्ये क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, एअरबॅग्ज, सिक्स-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि टू-स्पोक स्टीअरिग व्हील यासारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
बॅटरी पॅक निवडा
या कारमध्ये नऊ किलोवॅट प्रति तास, 12 किलोवॅट प्रति तास आणि 18 किलोवॅट प्रति तास असे बॅटरी पॅक्सचे तीन पर्याय आहेत.
भविष्यकालीन आणि इको फेंडली वाहनांच्या या यादीमध्ये भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसच्या ‌‘टीव्हीएस ज्युपिटर‌’चा समावेश होऊ शकतो. याच ऑटो एक्स्पो 2025 मध्ये ‌‘टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी‌’ स्कूटर सादर केली असून ती भारतातील पहिली सीएनजी स्कूटर आहे. ही स्कूटर कंपनीच्या ‌‘भारत मोबिलिटी 2025‌’ योजनेअंतर्गत सादर करण्यात आली असून त्यात अनेक नवीन आणि आकर्षक वैशिष्ट्यांसह उत्कृष्ट इंजिन देण्यात आले आहे.
इंजिन आणि कामगिरी
टीव्हीएस ज्युपिटर सीएनजी स्कूटरमध्ये 124.8 सीसी क्षमतेचे सगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 5.3 किलोवॅटची शक्ती आणि 9.4 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. ही स्कूटर पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही इंधनावर चालवता येते. सीएनजी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर स्कूटर 226 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते.
शक्तिशाली इंजिन तिला 80.5 किमी प्रति तास इतका टॉप स्पीड देते आणि ती एक किलो सीएनजीमध्ये 84 किमी पर्यंत प्रवास करू शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *