कल्याण : शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण, राज्यशास्त्र विभाग व मतदार साक्षरता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
“मतदान जागरूकता” हे उद्दिष्ट ठेवून निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मतदान प्रतिज्ञा घेवून मतदान करण्याचे वचन दिले. या स्पर्धांमध्ये अमित साळवे (निबंध स्पर्धा), मनोहर बहिरम (पोस्टर स्पर्धा), मेघना भाकरे (रांगोळी स्पर्धा) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजन प्रा. के डी शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना केडीएमसी व जिल्हा निवडणुक आयोगातर्फे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहेत.