मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणामधील २७ वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक व युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोळ यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती बद्दल २८ जानेवारी २०२५ रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
गणेश पोळ हे मुंबई पोर्टमध्ये ५ जानेवारी १९९८ रोनजी टॅली क्लार्क म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर त्यांना नोकरीमध्ये टीसीसीसी, ज्युनियर असिस्टंट, सीनियर असिस्टंट असा बढतीचा प्रवास मिळाला. गणेश पोळ यांचा २७ वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई पोर्टच्या जमीन धोरणात सहकार्य करण्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा होता. म्हणूनच तत्कालीन चेअरमन श्रीमती राणी जाधव यांनी मुंबई पोर्ट लँड पॉलिसीचा जो केंद्र सरकारला अहवाल पाठविला, त्यामध्ये त्यांचा नामोउल्लेख होता. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टमध्ये नोकरी लागण्यापूर्वी त्यांनी गुड नाईट या कंपनीच्या उत्पादकतेमध्ये संशोधनाचे मोठे काम केले आहे. त्यांच्या हुशारीचा व बुद्धिमत्तेचा मुंबई पोर्ट प्रशासनाला चांगलाच फायदा झाला. त्यांनी मुंबई पोर्टमध्ये प्रामाणिक व निस्वार्थीपणे सेवा केली. त्यांच्या सेवेचा अनेक कामगारांना व अधिकार्यांना चांगलाच फायदा झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासात गोल्ड मेडल मिळविले आहे. मुंबई पोर्ट मधुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन गणेश पोळ यांनी सिव्हीलमध्ये वकिलाची प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा व हुशारीचा न्यायालयामार्फत सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळो, अशा सर्वच वक्त्यांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गणेश पोळ यांच्या सेवाभावी कार्यावर आधारित ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे व फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्टचे मुख्य यांत्रिक अभियंता नितीन बोरवणकर, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर्स प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मनीष पाटील. संदीप चेरफळे तसेच कर्मचाऱ्यांमधील सहकारी मित्र मंगेश गवारे, संदीप गावडे. ॲड. गिरीश तळेकर. अधिकारी बोस, पत्नी रेखा पोळ मुलगी अनुषा पोळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. गणेश पोळ यांनी सत्काराला उत्तर दिले. या सत्कार सोहळ्यास युनियनचे पदाधिकारी शीला भगत, विष्णू पोळ, मारुती विश्वासराव, मीर निसार युनूस, संतोष कदम तसेच मुंबई पोर्टचे अधिकारी, गणेश पोळचे सहकारी मित्र, कुटुंबिय, गोदीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मंगेश सावंत यांनी सुंदर केले तर आभार युनियनचे संघटक चिटणीस आप्पा भोसले यांनी मानले.