केतन खेडेकर
मुंबई : मराठा सेवा सहकारी संस्था आयोजित एल आय सी पुरस्कृत मनसे भायखळा खाद्य महोत्सवाचे उद्घाटन मनसे सरचिटणीस संजय नाईक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सर्व महाराष्ट्रीयन पद्धतीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. हा खाद्य महोत्सव आज समाप्त होणार आहे. तरी जास्तीत जास्त खवय्यांनी या कार्यक्रमाला भेट द्यावी असे आवाहन मनसेचे विभागीय सचिव महेश दादा थोरात यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अध्यक्ष जगदीश राऊत, उपविभाग अध्यक्ष सुरेंद्र सुर्वे, अमोल रोग्ये, दिनेश शेट्टे यांनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमाला माजी आमदार यामिनीताई जाधव, मनसे नेत्या रीटाताई गुप्ता, मनसे महीला सरचिटणीस सुप्रीयाताई दळवी, सचिव ग्रेसी सिंग मुंबादेवी विभागअध्यक्ष प्रशांत गांधी यांनी भेट दिली.
