कल्याण :- तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि रेल्वे सुरक्षा बलाचे क्राईम इन्स्पेक्टर श्री संदीप ओंबासे हे उत्तराखंड येथे होणाऱ्या 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (नॅशनल गेमस्) या साठी 4 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधिमधे स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत 32 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील जवळजवळ 900 पुरुष व महिला खेळाडू पदाधिकारी, मार्गदर्शक, संघव्यवस्थापक, अधिकारी व पदाधिकारी सहभागी होत आहे. या स्पर्धेस विशेष अतिथी म्हणून आमंत्रीत असणारे संदीप ओंबासे हे खेळाडूंचा उत्साह, मनोधैर्य तसेच खेळाडूंना स्फूर्ती व प्रेरणा देणारी ठरणार आहे. यामुळे उत्तराखंड येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपल्या महाराष्ट्राचा संघगुणवत्तेचा नविन विक्रम करणार आहे. गतवर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे पुन्हा संपूर्ण भारतात प्रथम येऊन राज्याचा दैदिप्यमान गौरव अबाधित ठेवण्या साठी आपली उपस्थिती मोलाची ठरणार आहे. असे मत महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *