मुंबई : मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर व श्री. ना.ग.आचार्य व श्री. दा.कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्र. दि.०७ व  शनि.०८ फेब्रुवारी २०२५ रोजी या दोन्ही दिवशी दु.०३ ते ०७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. सदर संमेलनात सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ यांची श्री. घन:श्याम परकाळे निर्मित व दिग्दर्शित ‘नाती’ ही एकांकिका तसेच अयोध्येची उर्मिला या कादंबरीच्या लेखिका डॉक्टर स्मिता दातार यांची मुलाखत तर दुसऱ्या दिवशी चित्रपट, मालिका आणि नाटक या तीनही माध्यमात सहज वावरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती स्मिता ओक यांचा नजराणा हास्याचा तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, पोलीस मन या पुस्तकाचे संवेदनशील लेखक श्री. अजीत देशमुख यांची मुलाखत असे कार्यक्रम असतील. मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी या संमेलनास उपस्थित राहून साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *