अशोक गायकवाड

रायगड : सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक संपर्क क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत.ही माहिती नागरिक व मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे असे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक (सर्व साधारण ), निवडणूक निरीक्षक (पोलीस) आणि निवडणूक निरीक्षक (खर्च) यांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निवडणूक निरीक्षक संपूर्ण निवडणूक कालावधीत शासकीय विश्रामगृह अलिबाग ता. अलिबाग, जि .रायगड येथे पूर्वनियोजित भेटीसाठी दुपारी बारा ते एक या वेळेत उपलब्ध असतील.निवडणूक निरीक्षक यांची माहिती खालीलप्रमाणे – संजीव कुमार झा, निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) संपर्क क्रमांक-९६९९९७६८११, संपर्क अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता उपेंद्र दीक्षित आहेत ते जिल्ह्यातील निवडणूक संबंधित सर्वसाधारण बाबी पाहतील. श्रीमती जोयस लालरेम्मवी निवडणूक निरीक्षक (पोलीस), संपर्क क्रमांक-९०२२७४२२४०. त्यांचे संपर्क अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अजित गोळे आहेत. जिल्ह्यातील निवडणूक संबंधित कायदा व सुव्यवस्था विषयक बाबी पाहतील. धिरेंद्रमणी त्रिपाठी , निवडणूक खर्च निरीक्षक, संपर्क क्रमांक-९३७३३६४५३२. सहायक संचालक लोकल फंड प्रवीण वडगाये त्यांचे संपर्क अधिकारी आहे. ते निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *