मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीचा पहिला टप्पा देशभरात आज पार पडला. काही तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पड़ले. यात महाराष्ट्रातील पाच मतदार संघाचा समावेश होता. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.२९ टक्के मतदानाची नोंद झाली. देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदान नोंदविले गेले आहे.

आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्किमच्या 92 विधानसभा मतदारसंघातही मतदान पार पडले आहे. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले असून 77.57% मतदान झाले आहे. दुसरा क्रमांक त्रिपुरा राज्याचा असून 76.10% मतदान झाले आहे. मेघालय 69.91%, मध्य प्रदेश 63.25%, तामिळनाडु 62.08%, यूपी 57.54%, बिहार 46.32%, उत्तराखंड    53.56%, जम्मू-कश्मीर 65.08%, राजस्थान 50.27%, छत्तीसगढ़ 63.41%, असम 70.77%, पाँडिचेरी 72.84%, अरुणाचल 64.07%, नागालैंड    56.18%, मिजोरम 53.96%, सिक्किम 68.06%, मणिपुर 68.62%, अंडमान निकोबार 56.87%, लक्षद्वीप 59.02%, महाराष्ट्र 54.85% एवढे मतदान झाले आहे.

सर्वात कमी मतदान हे बिहारमध्ये झालेले आहे. येत्या ४ जूनला मतमोजणी होणार आहे.

नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

नागपुरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नागपुरातील जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी १२ ते १च्या सुमारास ही घटना घडली. भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक, खोली क्रमांक कळवण्यासाठी जी छोटी कागदी स्लिप दिली. त्या स्लिपवर नितीन गडकरी आणि भाजपचा निवडणूक चिन्ह होते. तसेच नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिलेली असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवर केलाय. परिणामी, ही कृती नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप करत त्यांना गडकरींचा फोटो आणि भाजपचा निवडणूक चिन्ह छापून देणारी मशीन तिथून हटवण्यास सांगितले. यावरुन दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला. तसेच यातील संतप्त काँग्रेसचा एक कार्यकर्त्याने ही मशीन फोडल्याची माहितीही पुढे आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.

नागालँडमध्ये शुन्य मतदान

नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्येएकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यामुळे येथील सर्व मतदान केंद्रावर शुन्य मतदान नोंदविले गेले. या राज्यातील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने मतदान करण्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मतदारांनी पाठिंबा देत बहिष्कार टाकला. त्यामुळे सहा जिल्ह्यात शून्य टक्के मतदान झाले.

नागालँडमध्ये पूर्वेकडील मोन, तुएनसांग, लोंगलेंग, नोक्लाक, शामटोर आणि किफिरे हे सहा जिल्हे आहेत. आता नागालँडमध्ये सध्या भाजपा सत्तेत आहे. मात्र, या सहा जिल्ह्यांसाठी सरकारने दिलेले आश्वासने पाळले नाहीत, त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले जात आहे. नागालँडमधील ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनने या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केलेली आहे. पण हे आश्वासन पाळले जात नसल्यामुळे बहिष्काराचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *