मुंबई : जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिसे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणूकीत दहा वर्षांची हुकमशाही संपणार आणि भाजपाचा पराभव होणार असा विश्वास व्यक्त केला.

मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवले. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार, उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले, कामगारांना देशोधडीला लावले, महिलांना फसवले, त्यामुळे जनता नाराज आहे. ही जनताच आता फैसला करेल असेही पटोले यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान पार पडले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची हुकुमशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे भाजपाचा दारुण पराभव होणार हे अटळ आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *