रविवारी रंगणार वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोष
अनिल ठाणेकर
ठाणे: दिवंगत श्रेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचावर येत्या रविवारी २१ तारखेला रत्नाकर मतकरी स्मृती नाट्यजल्लोषाचे १२ वे पर्व रंगणार आहे. जागा आहे ठाणे मेंटल हॅास्पिटल जवळील दादा कोंडके खुला रंगमंच आणि वेळ आहे संध्याकाळी ४ वाजता.
ठाणे शहरातील रमाबाई नगर, मानपाडा, किसन नगर आदि विभाग आणि कळवा, घणसोली, केवाणी-दिवे अशा आसपासच्या गावातील अनेक वस्त्यांमधून वंचित समाजातील मुले मुली ‘बदलते शहर’ या थीमवर आधारित त्यांनीच लिहिलेल्या, त्यांनीच बसवलेल्या आणि अभिनय, नेपथ्य, संगीत हे सगळं त्यांनीच केलेल्या नाटिका सादर करणार आहेत. बदलत्या शहराबरोबरच माणसांमध्ये होत असलेले सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि इतर घटकांमधले बदल आणि त्याबद्दल तरुणाईच्या मनात उठणारी स्पंदने या नाटिकांमधून व्यक्त केली जाणार आहेत, अ्से नाट्यजल्लोषच्या संयोजिका सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले आहे.सुप्रसिद्ध रंगकर्मी व लेखिका सुप्रिया विनोद उपस्थित राहून या नाटिकां मधील वैशिष्ट्यपूर्ण लेखन,अभिनय, सादरीकरण आदींना विशेष पुरस्कार देणार आहेत. प्रसिद्ध रंगकर्मी चिन्मयी सुमीत, दिपक राजाध्यक्ष, विजू माने, उदय सबनिस आदींना या कार्यक्रमास उपस्थित राहून लोकवस्तीतील हेतकरू युवा कलाकार – कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निमंत्रित केले आहे.सर्व संवेदनशील रसिक ठाणेकरांना आवाहन आहे की त्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावे आणि या मुलांच्या कलाकारीला प्रोत्साहन द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *