नवीमुंबईतील ठाकरेंचे निष्ठावंत

नगरसेवक मढवी शिंदेंच्या सेनेत

सिध्देश शिगवण

नवी मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीआधी नवीमुंबईतील उद्धव ठाकरेंचे मातब्बर नेते माजी नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावर २७ एप्रिल २०२४ ला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अडीच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एकनाथ शिंदे सेनेत दाखल होण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जातोय असा आरोप करून त्यांनी ठाकरेंच्या पक्षातच राहणे पसंद केले होते. आज अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा भगवा खांद्यावर घेतला.

मनोहर कृष्णा मढवी यांच्याकडे ठाकरे सेनेच्या ऐरोली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख पद होते. ऐरोली मतदारसंघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांच्या प्रवेशाने महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. एम के मढवी त्यांच्या सोबत विनया मढवी (पत्नी), करण मढवी (मुलगा) तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील, त्यांचे पती मिथुन पाटील यांच्यासह इतर नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

यावेळी मढवी यांच्यासह उबाठा गटाच्या ऐरोली शहर संघटिका सोनाली मोरे, विभागप्रमुख सुरेश भास्कर, शाखाप्रमुख अमित जांभळे, माजी परिवहन समिती सदस्य राजेश घाडी यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *