ठाकरे सेनेचे मिशन मुंबई…
मुंबई : नगरपरिषदेतील निकाल विरोधात जात असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. गिरगावमधील साहित्य संघ मंदीरात आयोजित दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ मधील निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेते अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागसंघटक युगंधरा साळेकर उपस्थित होते.
