गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात परिचारिकेचा आढळला मृतदेह

कल्याण : कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवेली ग्रामीण रूग्णालय परिसरात परिचारिकेचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवेली शासकीय रूग्णालय परिसरातील कामगार काँटर परिसरात राहणाऱ्या परिचारिका कामिनी गायकवाड ह्या रविवारी दुपारी साडेतीन-चार च्या सुमारास  त्या  इमारतीच्या टेरेसवर झाडांना पाणी घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने किंवा अन्य कारणाने तोल जाऊन त्या खाली कोसळल्या असाव्यात असा प्रथमदर्शनी अहवाल सादर करण्यात आला आहे. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. बराच वेळ हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही, मात्र सायंकाळच्या सुमारास परिसरात काम करणाऱ्या मजुरांना त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. यासंदर्भात पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करीत आकस्मात मुत्यू झाल्याची नोंद केली आहे.

कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षण पकंज गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गोवेली शासकीय रूग्णालय कामगार काँटर येथे निवास करणार्या परिचारिका कामिनी गायकवाड यां झाडांना पाणी देण्यासाठी टेरेस वर गेल्या असता पडल्याने त्यांचा मुत्यू झाला, त्यासमयी त्या एकटया होत्या. त्यांची दोन्ही मुले बाहेर गेली होती. त्यांना बीपीचा त्रास देखील होता. या प्रकरणी एडीआर दाखल केला असल्याचे सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *