मतदान करा, लोकशाही मजबूत करा”

SVEEP मोहिमेतून आवाहन

मिरा-भाईंदर – शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नाताळ सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत यांनी उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व समजावून सांगत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाची गरज स्पष्ट केली.

यावेळी नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच आगामी निवडणुकीत निर्भयपणे व जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. महापालिका प्रशासनाने सांगितले की, आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *