मुंबई : वर्षाखालील शालेय मुलांचं मोफत कबड्डी शिबिर सन्मित्र क्रीडा मंडळ व श्री साई क्रीडा मंडळ घाटकोपर यांच्या विद्यमानाने गजानन ईंटरप्राईज यांच्या सहकार्याने २६ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात कबड्डीतील नामवंत खेळाडू तसेच प्रशिक्षक व आयोजकांकडून योग्य मार्गदर्शन खेळाडूंना लाभणार आहे. कबड्डीचे नियम समजावून सांगितले जातील. स्पर्धा कशी खेळावी याचे मार्गदर्शन केले जाईल. निर्णायक क्षणी खेळाडूंनी आपला कस कसा लावावा याचे मार्गदर्शन तज्ञ खेळाडूंकडून केले जाईल. खेळाडूंमध्ये वेगवेगळे संघ बनवून त्यांची स्पर्धात्मक तयारी केली जाईल. या शिबिराचा लाभ सर्व खेळाडूंनी घ्यावा. असे आवाहन सन्मित्र क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक दीपक कांदळगावकर यांनी केले आहे. सदर शिबिर सन्मित्र क्रीडा मंडळाचे मैदान, पंतनगर बिल्डिंग नंबर २७च्या मागे पंतनगर, घाटकोपर पूर्व मुंबई.येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत घेतले जाईल. शिबिरात सहभागी होण्यासाठी अविनाश महाडिक मो. नंबर ९००४७५४५०७ यांच्याशी संर्पक साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *