रोहीत पवारांच्या ताफ्याची निवडणूक आयोगाकडून झडती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांची पिंपरी चिंचवड मध्ये तपासणी करण्यात आली आहे. रोहित पवार आज बैठकीसाठी शहरात आले होते. ते मुंबई वरुन हेलिकॉप्टरने पिंपरी चिंचवडच्या एका कंपनीतील हेलिपॅडवर आले. त्याठिकाणी रोहित पवारांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी तपासणी केल्याचे पाहायला मिळाले.

याच मुद्यावरुन रोहित पवारांना निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाही, मात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होते, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. रोहीत पवारांचा टोला एकनाथ शिंदेंच्या कोकणातील दौऱ्याबाबत होता.

 महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बॅग तपासल्या जात नाहीतआमच्या रिकाम्या गाड्या तापसल्या जातात. अशी टीका रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टवर करण्यात आली आहे. कार्यक्षम आणि तत्पर निवडणूक आयोगाचं कौतुक आणि कमाल वाटते. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांचीही तपासणी होत नाहीमात्र आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी होतेअशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *