मुंबईकर महायुतीलाच मतदान करतील- देवेंद्र फडणवीस

मुंबई : कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष करत आहेत. निवडणुकीसाठी आणखी दोन-चार जण त्यांनी सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचे काम बघूनच आम्हाला मतदान करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 ज्याप्रकारे या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवायचे काम केले आणि पाप केले आहे, त्यामुळे मराठी माणूस त्यांच्यासोबत नाही. मुंबईत यांच्यासोबत यायला कोणीही तयार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला आहे. केवळ निवडणुका जवळ आल्या की भावनिक बोलायचे. पण जनता आता या भावनिक बोलण्याला भुलणारी नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
मुंबईत महापौर कोणाला करायचं अशी लढाई नाही. मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आणायची आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जिहादी मानसिकता ठेचण्यासाठी आम्ही उतरलोय, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *