मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक जाहिराती हटवल्या असून, त्यापैकी सर्वाधिक जाहिराती या सार्वजनिक जागेवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांमध्ये बॅनर हटवण्याचे काम सुरू आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या पहिल्या २४ ते ४८ तासांत पालिकेने शहराच्या विविध भागांतून २,१०३ पेक्षा जास्त अनधिकृत राजकीय जाहिरात साहित्य हटवले होते. त्यानंतरच्या पुढल्या दिवसात या कारवाईला आणखी वेग देण्यात आला.
