मुंबई : राजकीय वारसा घरातूनच लाभलेल्या युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील या निवडणूक रिंगणार उतरणार की नाही याची आतापासूनच मीडिया तसेच मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून त्या कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवतील याच्या तर्क-वितरकांना उधान आले आहे. लवकरच या सर्व तर प्रश्नांना पूर्णविराम मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांची कन्या युवा सेना कार्यकारिणी सदस्य राजोल संजय पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. भांडुप पश्चिम येथील मतदार संघातील एका प्रभागातून त्या निवडणूक लढविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी चालू असून त्यांना कुठला प्रभाग मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र त्यांच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या निर्णयामुळे आतापासूनच भांडुप पश्चिम मध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजोल पाटील यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला असून गेले अनेक वर्ष ते सामाजिक कार्यात भाग घेत आहेत.तळागाळातील लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, गटार, नाले, शौचालय यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात त्यांनी मोलाचे काम केले आहे. राजोल पाटील हा मतदारांसाठी नवा चेहरा नसून त्यांच्या मदतीला धावणारे एक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ‘जीवनदान’ या संस्थेमार्फत त्यांनी हजारो लोकांना नेत्रदान केले असून त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जात आहे.
