पोलिसांची मोठी करवाई

डोंिबवली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांनी तपासणीदरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. नथुराम तांबोळी असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आगामी निवडणुकीदरम्यान कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी पोलिस घेत आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी संशयास्पद वस्तूंसह संशयितांची तपासणी केली जात आहे. सोबतच रेल्वेस्थानक आणि परिसरासह लोकलमधून प्रवास करणाऱ्या संशयितांची तपासणी केली जात आहे. सीएसएमटी-टिटवाळा लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी पोलिस पेट्रोलिंग करत असताना शहाड ते टिटवाळा रेल्वेस्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातात संशयास्पद बॅग आढळून आली होती

यावेळी आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी त्याला टिटवाळा स्थानकावर ताब्यात घेत त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता बॅगेत देशी आणि विदेशी मद्याच्या २०० बाटल्या आढळून आल्या. हा मद्यसाठा शहाड येथील एका व्यक्तीच्या दुकानातून घेतला असल्याची माहिती त्याने दिली.

यामध्ये नथुराम तांबोळी असे दारूच्या साठ्यासह ताब्यात घेतल्याचे नाव असून तो खडवली परिसरात राहणारा आहे. या प्रकरणाचा लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *