कल्याण पूर्वेत भाजपा उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप
आमदार सुलभा गायकवाड यांच्याहस्ते देण्यात आले एबी फॉर्म
कल्याण : आगामी होणाऱ्या कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजपा उमेदवारांना कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.
भाजपाच्या वतीने कल्याण पूर्वेत मनीषा गायकवाड, हेमलता पावशे, सरोज राय, डॉ. पूजा गायकवाड, स्नेहल मोरे, इंदिरा तरे, रेखा चौधरी, प्रणाली जोशी तसेच विक्रम तरे यांना आमदार जनसंपर्क कार्यालयात पक्षादेशानुसार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून ए-बी फॉर्मचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी कल्याण जिल्हा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, उद्योगपती संजय गायकवाड, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, नितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, विजय जोशी, यशोदा माळी तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकाभिमुख विकास, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाच्या बळावर सर्व उमेदवार जनतेचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास यावेळी आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.
