स्वाती घोसाळकर
मुंबई : राज्यातील २९ महानगर पालिकेच्या निवडणूकांसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असतानाच राज्यातील सर्वच पक्षात सत्तेसाठी फाटाफूट आणि ताटातूट पहायला मिळाली. काहींच्या डोळ्यात आनंदाचे तर काहींच्या डोळ्यात दुखाचे अश्रु होते. निष्ठा, विष्ठा, गद्दार, बंडखोर अशा शब्दांची मुक्तहस्ते उधळण आज दिवसभर सर्वच पक्षात पहायला मिळाली. फाटाफुटीचा हा ताण प्रत्येक पक्षावर इतका होता की विरोधातील जाऊदे पण सत्तेत असलेल्या भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही आपल्या अंतिम याद्या अजून जाहिर करता आलेल्या नाहीत. याद्या जाहीर न करताच संबधित उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत.
