दापोली – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची ताज्या मासळी खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे हर्णबंदर हाऊसफुल्ल झाल आहे. हर्णे बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेच्या स्वरूप आले आहे.
पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुके मासे खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावत असतात. मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दापोलीचे थंड अल्हाददायक वातावरणदापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला केळशी ते दाभोळ पर्यंतचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि नारळी -फोपळीच्या बागांची सावली यामुळे पर्यटकांकडून दापोलीतील समुद्रकिनाऱ्याला जबरदस्त पसंती मिळत आहे. दापोलीत दाभोळबुरोंडीआडेकेळशी बंदरात मासेमारी होत असली तरी मुख्यत्वे हर्णे हे तालुक्याचे ताजी मासे मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळसंध्याकाळ असा दिवसातून दोनदा मासळीचा लिलाव होत असतो.
महाराष्ट्रातून पर्यटक मासळी खरेदीसाठी हर्णे बंदरात आवर्जून येतात. थर्टी फस्टच्या निमित्ताने २०२५ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तर २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. दापोलीत पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे तालुक्यातील किनारपट्टी आणि किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल्सरिसॉर्ट मध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेलरिसॉर्ट हाउसफुल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *