महायुतीमुळे भाजपानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केली नाराजी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आता नारीज नाट्य चांगलेच रंगले आहेत. काहींना उमेदवारी मिळाली नाही म्हणून तर काहींना प्रभाग सुटला नाही म्हणून. तर काही जण युती झाली आहे म्हणून नाराज आहेत. ही नाराजी आता बाहेर येवू लागली आहे. त्यातूनच एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक कैलाश शिंदे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी एकनाथ शिंदेंकडेच केली आहे. त्यासाठी त्यांनी पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी आपली हकालपट्टी का करा याची कारणेच दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर आगपाखड करताना आपल्या पक्षावरही टीकेची झोड उठवली आहे. या मुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापवे आहे. तर शिवसेनेचे कल्याण पूर्व उपशहर प्रमुख मनोज चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युतीमुळे आपल्याला तिकीट मिळणार नसल्याच्या कारणास्तव पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कैलाश शिंदे यांनी शिंदेनाच लिहीलेल्या पत्राची सध्या चांगलीच चर्चा आहे. ते पत्रात लिहीतात कल्याण डोंबिवली महापालिकेत चार प्रभागाची निवडणूक लागली आहे. सामान्य उमेदवाराला चार प्रभागाचा खर्च परवडणारा नाही. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला कदर राहीलेली नाही. शिवाय भाजप सोबत झालेली युती आपल्याला अजीबात मान्य नाही. गेली २० वर्षा आम्ही भाजप सोबत लढत आहोत. भाजप हा पक्ष आपल्याला बिल्कुल आवडत नाही. त्यांनी लोकसभेनंतर विधानसभेला शिवसेनेचे काम केले नाही. त्यांचे काम आता आम्ही का करावे? अशा स्थितीत पक्षात राहून काम कसं करायचं. त्यामुळे नाव खराब करण्यापेक्षा मला पक्षातून काढून टाका अशी थेट मागणी कैलास शिंदे यांनी पत्रा द्वारे एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
