कर्जत: कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप भोसले यांची श्रीवर्धन पोलीस ठाण्यात बदली झाली असून त्यांच्या जागी श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची कर्जत पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी नवीन पोलिस निरीक्षक पाटील यांची दैनिक बित्तंबातमीचे मुंबई ,कोकण प्रतिनिधी अशोक गायकवाड, दैनिक कर्जत प्रभातचे संपादक जयेश जाधव यांनी यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान नवीन नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे १९९६ पासून मुंबई पोलिसात होते.त्यानंतर त्यांनी २०२१ पासून गोंदिया या नक्षल भागात काम केले आहे. त्यानंतर २०२३ पालघर आणि २०२४ पासून रायगड पोलिसांमध्ये कार्यरत आहेत. अलीकडेच ते जुलै २०२५ मध्ये श्रीवर्धन पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र त्यांना आता कर्जत या महानगर प्रदेश क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.
