मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पाईंट येथील मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आग लागली. किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणीलीय. एलआयीसी मुख्यालयासमोरील या कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रचाराचं साहित्य असल्याने त्यांना किती नुकसान पोहचले याचा आढाव घेतला आजत आहे.
रविवारचा दिवस असल्याने मुंबईच्या कार्यालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं. त्यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. भाजप कार्यालयाच्या मागच्या बाजूने ही आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट उसळले. रविवारचा दिवस असल्याने कार्यालयात गर्दी नव्हती. त्यामुळे या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.
या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मंत्रालयाचा परिसर आहे. तर या कार्यालयाच्या शेजारी मोठा हॉल आहे. अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील हे प्रमुख कार्यालया असून या ठिकाणी राज्यभरातून अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कायम राबता असतो. पण आज रविवार असल्याने या ठिकाणी फारसे कुणी नव्हते.
