ठाणे : नववर्षाचे स्वागत रक्तदान करून करायचे ही परंपरा कायम ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानववर्षदिना निमित्त आयोजित मध्यरात्रीच्या रक्तदान शिबीरात रक्तदान केले.

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेले हे ‘मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर’ ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचे उत्तम प्रतिक आहे. या उपक्रमात सहभागी होऊन मी दरवर्षी रक्तदान करतो. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना सामाजिक बांधीलकी जपण्याचा संदेश याद्वारे तरुणाईला घालून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.व धर्मवीरांचा तोच वारसा आजही शिवसेना पुढे घेऊन जात असल्याचे याप्रसंगी त्यांनी नमूद केले. यावेळी वर्षानुवर्ष या उपक्रमात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना तसेच डॉक्टरांना विशेष सन्मानचिन्ह देऊन शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

नवीन वर्षात पाऊल ठेवतानाच आपल्या देशाची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नाशिक ते अक्कलकोट या सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजुरी देऊन महाराष्ट्राला नवीन वर्षाची अनोखी भेट दिली आहे. या दोन्ही कारणांसाठी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे विशेष आभार मानले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या वर्षभरात शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून वर्षभर अनेक आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी शिंदे यांनी जाहीर केले.

यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रवक्ते राहुल लोंढे, बाळा गवस तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि रक्तदाते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *