उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्हासनगर शहरातील १ ते २० प्रभागांमधून जवळपास ७०२ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले होते . उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली असता त्यात २८ उमेदवारांचे अर्ज छाननीच्या वेळी बाद करण्यात आले आहेत. एकूण या निवडणुकीच्या रिंगणात शहरातून ६७४ उमेदवार उभे राहिले असून त्यापैकी उद्या २ जानेवारी २०२६ पर्यंत किती जण उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने उल्हासनगरात २३ डिसेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ पर्यंत शहरातील ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून तब्बल १५०२ उमेदवारांना नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली होती. तसेच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी देखील २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आला होता. ६ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालया पैकी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ मध्ये-११८ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ मध्ये-७९, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ मध्ये-१०४, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ मध्ये-१२२, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ मध्ये- ११० तर, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ६ मध्ये-१६९ असे ७०२ नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली होती. त्यापैकी अंतिमरित्या स्वीकारण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्या ६७४ इतकी आहे.
३१ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली त्यावेळी २८ नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात( बाद ) करण्यात आली. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक -१ मधून १३ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक -२ मधून १ , निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक -३ मधून ३ , व निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक – ६ मधून ११ असे २८ नामनिर्देशनपत्रे फिटळण्यात ( बाद ) करण्यात आले आहेत. नामनिर्देशन पत्रामध्ये अनेक त्रुटी असल्या कारणास्तव ती बाद करण्यात आली आहेत. तसेच नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी २०२६ असून ३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक चिन्ह उमेदवाराला देण्यात येणार आहे. त्याच दिवशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (निवडणूक) गणेश शिंपी यांनी दिली.
00000
