माजी नगरसेवक विजय काटकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आर्थिक देवाण-घेवाण मधून प्रवेश झाल्याचा उपशहर प्रमुख सुरेश सोनार यांचा आरोप
कल्याण : मुलीला उमेदवारी न मिळाल्याचे कारण देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख विजय काटकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून हा प्रवेश आर्थिक देवाणघेवाण मधून झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उपशहर प्रमुख सुरेश सोनार यांनी केला आहे. तसेच जिल्हा अध्यक्ष विजय बंड्या साळवी यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सोनार यांनी सांगितले आहे.
गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपशहर प्रमुख विजय काटकर यांनी शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उमेदवार निश्चित केले असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यामुळेच माझ्या मुलीला उमेदवारी मिळाली नाही असा आरोप केला होता. याचे उपशहर प्रमुख सुरेश सोनार यांनी खंडन केले असून पॅनल क्रमांक चार मधील उमेदवार केवळ त्यांच्या निवडून येण्याच्या निकषावरच त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. यामधील बल्याणी विभागातील उंभरणी गावचे अनुसूचित जातीचे तेजश्री हेमंत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक फोडाफोडीच्या राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षावर निष्ठा ठेवून पक्षासोबत राहिलेले दया शेट्टी यांच्या पत्नी रूपा शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एकत्र असून मनसेचे राहुल कोट यांना उमेदवारी देण्यात आली असून विभाग प्रमुख लक्ष्मण तरे आणि उप विभाग प्रमुख शत्रुघ्न तरे यांचे बंधू राम तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ निवडून येण्याचा निकष पाहण्यात आला असून यात कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण झाली नसल्याचे उपशहर प्रमुख सुरेश सोनार यांनी सांगितले.
ऐन निवडणुकीच्या काळात माजी नगरसेवक विजय काटकर यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असून पक्षाने त्यांना नगरसेवक सभापती केले असून अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत त्यांनी कोणत्याही पक्षात जावे परंतु आपल्याला ज्या पक्षाने मोठे केले आहे त्या पक्षावर अशा पद्धतीने टीका करणे चुकीचे आहे असे सोनार यांनी सांगितले आहे. यावेळी विभाग प्रमुख लक्ष्मण तरे, उपविभाग प्रमुख अजय पाटील विभाग प्रमुख विजय कोट उपविभाग प्रमुख शत्रुघ्न तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
