स्वाती घोसाळकर

मुंबई  : लाडक्या बहीणींनी विधानसभेत महायुतीला दिलेल्या अभुतपुर्व यशाची दखल घेऊन मुंबई महानगर पालिकेत ठाकरे बंधूनी सत्ता आल्यास घरकाम करणाऱ्या लाडक्या घरकाम ताईंना महीना १५०० रुपये देण्याचा शब्द दिलाय. हा ठाकरेंचा शब्द अशी स्लोगनच आज ठाकरे ब्रँडकडून लाँच करण्यात आली.

मुंबईत घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करून त्यांना दर महिन्याला १५०० रूपये देणाचे जाहिर करतानाच ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार, कष्टकरी मुंबईकरांना १० रूपयांत नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी माँ साहेब किचन योजना, पुढील ५ वर्षात १ लाख मुंबईकरांना परवणारी हक्काची घरे देणार असा वादा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेने मुंबईंकरांना दिलाय.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी प्रचारातील महत्वाच्या १५ मुद्दांवर सादरीकरण करून मार्गदर्शन केले.

घरकाम करणाऱ्या महिला हा मुंबईतील मोठा मतदारांचा टक्का आहे. याची एकगठ्टा मते मिळविण्यासाठी ठाकरे बंधूंनी या घरकाम ताईंना १५०० रुपयांची घोषणा करून प्रचारात आघाडी घेतली आहे.

दरम्यान, ज्यावेळी मतं मागण्यासाठी घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातील,की तुम्ही कशासाठी उभे राहताय.त्यासाठी आम्ही १५ मुद्दे काढले आहेत,हा शब्द ठाकरे यांचा आहे. आणि तो तुम्ही लोकांच्या मनावर बिंबवा असे आवाहन आदित्य आणि अमित ठाकरे यांनी केले.

मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास,प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग,बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना आदी मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय,महापालिका,बेस्ट आणि पोलीस कर्मचा-यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार.मुंबई महापालिकेचे स्वत:चे गृहनिर्माण प्राधिकरण निर्माण करणार,पुढील ५ वर्षात १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरे देणार, मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलो मीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालये बांधणार,प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग,मुंबईत पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये पालिकेतर्फे उभारणार, रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रूग्णांना जेनेरिक औषधे मोफत देणार,ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ केअर कंट्रोल रूम ,आणि हेल्थ-टू-होम सेवा,महापालिकेची स्वत: ची रुग्णवाहिका सेवा सुरू करणार,मुंबई महापालिकेचे स्वत:चे कॅन्सर रुग्णालय उभारणार,सर्व माध्यमांच्या शाळांत बोलतो मराठी‘ उपक्रम राबविणार अशी विविध वचने आज हा ठाकरेंचा शब्द या वचननाम्यात देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *