वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करणाऱ्या रिक्षावाल्यास भाजपा उमेदवाराची दमदाटी

मिरा – भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करणाऱ्या रिक्षावाल्यास भाजपा उमेदवाराने धमकी दिला प्रकार नवघर, भाईंदर येथे घडल्याचे पक्षाचे महासचिव अनिल गवस यांनी सांगितले. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मिरा -भाईंदरमध्ये १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरावल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

आमची काँग्रेसशी युती होऊ शकली नाही असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इकबाल महाडिक पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आमचे उमेदवार निवडून येणार आणि सुंदर मिरा – भाईंदरसाठी काम करणार तसेच ठेकेदारांची कमिशनशाही संपविणार असं त्यांनी जाहीर केले. उमेदवारांमध्ये प्रियांका माने ही दिव्यांग प्रतिनिधी असून दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी ती प्रयत्न करणार असं त्यांनी जाहीर केलं. आमच्या पक्षाचा प्रचार करणाऱ्या रिक्षाला भाजपा उमेदवार सचिन डोंगरे यांनी दमदाटी केल्याचे अनिल भगत यांनी सांगितले. त्याबद्दल पोलिसात तक्रारीचे पत्र दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *