रोहा विभागात ‘विद्युत सुरक्षा व तणाव मुक्त जीवन जगण्याची कला’ ची कार्यशाळा

रायगड : वीजे सारख्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात काम करताना सर्व सुरक्षा उपाय लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासोबतच, शांत मनाने काम करणे हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. महावितरण आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत खूप जागरूक असून कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुरक्षा उपकरणे पुरविली आहेत. काम करताना सुरक्षा उपकरणे वापरण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रे आणि सेमिनार आयोजित करत असते. नुकतेच, महावितरणचे रोहा  विभाग कार्यालय अतंर्गत विद्युत सुरक्षा व तणाव मुक्त जीवन जगण्याची कला या कार्यशाळेचे आयोजन मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षाब केंद्र) अरविंद  भादीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथे १ जानेवारी आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, प्रशिक्षण व सुरक्षा (नाशिक) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी संगणकीकरण द्वारे अत्यंत सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांना स्वतःची सुरक्षा व काम करते वेळेस घ्यावयाची दक्षता आणि तणाव मुक्त जीवन जगण्याची कला यावर दैनंदिन घडणार्‍या बाबींचे समर्पक उदाहरण देऊन सादरीकरण केले. डॉ राठौर यांनी विद्युत लाइन वर काम करताना ‘डिस्चार्ज रॉड है तो सेफ हैं’ हा मंत्र  ध्यानात व मनात रुजवून काम केल्यास शून्य अपघात हे महावितरणचे ध्येय साध्य होईल असे मत व्यक्त केले.त्यांनी जीवनात सर्व प्रथम स्वतःची सुरक्षा महत्वाची आहे तसेच  तणाव मुक्त जीवन जगण्याबाबत  कर्मचारी सोबत प्रात्यक्षिके सादर केली. दैनंदिन जीवन शैलीत काम करीत असताना  कार्यालय  व घर यांच्यात समतोल राखण्यासाठी  आवश्यक मार्गदर्शन तत्त्वे त्यांनी दिल्या.

कार्यकारी अभियंता, रोहा  प्रदीप दाळू यांनी सुरक्षित साधणे वापरून काम करण्याचे आवाहन केले. तसेच, कार्यकारी अभियंता, प्रशिक्षण व सुरक्षा (नाशिक)  प्रमोद पाटील यांनी सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी असे सुचवले. कार्यशाळेत सीपीआरचे प्रशिक्षण सदर देण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता रोहा,  श्रावण कुमार व रोहा विभागाअंतर्गत सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, उपकेंद्र यंत्रचालक, बाह्यस्त्रोत कर्मचारी बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *