पूर्णप्रज्ञा सरस्वती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश
कल्याण : विरार येथे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संघटना असलेल्या STAIRS फाउंडेशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांची मालिका सुरू करण्यात आली आहे.लहान शहरांतील शालेय विद्यार्थ्यांमधून होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रीडा प्राविण्याला संधी उपलब्ध करून देण्यासाठी हि संस्था कार्य करत असते. स्थानिक क्रीडा टप्प्यांपासून राष्ट्रीय क्रीडा टप्प्यांपर्यंत प्रगती करण्यासाठी तरुण खेळाडूंना एक उत्कृष्ट असा संरचित मार्ग प्रदान करण्याचा संस्थेचा मानस असल्याने तळागाळातील खेळाडूना योग्य ती संधी देऊन त्यांना प्रोत्साहन देताना त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने पुढे जाण्यासाठी मदत करून,देशासाठी योग्य खेळाडू घडविण्याचे ध्येय ठेवून ही संस्था काम करते.
जिल्हा पातळीपासून वरच्या स्तरावरील प्रतिभेची ओळख करून त्या खेळाडूंचा विविध क्रीडा प्रकारातील त्यांच्या नैपुण्याला आणखी विकसित करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. या संस्थेकडून बहु-क्रीडा कार्यक्रम राबविण्यात येतात, जसे की फुटबॉल, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कराटे आणि बरेच काही यासारख्या खेळांचा समावेश असतो. युवा सक्षमीकरण: खेळांद्वारे कौशल्य विकास, सांघिक कार्य आणि समावेशक विकासाला प्रोत्साहन देणे.त्यातून यशस्वी राज्यस्तरीय आणि देशपातळीवर खेळाडू तयार व्हावे हे STAIRS चे ध्येय आहे.
याच अनुषंगाने टिटवाळ्यातील दिलासा फाउंडेशन संचालित पूर्णप्रज्ञा सरस्वती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कराटे खेळात मोठे यश मिळवून शाळेचे नाव चमकावले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविल्याबद्दल दिलासा फाउंडेशनच्या सचिव डॉ.पद्मिनी कृष्णा यांनी आनंद व्यक्त करतांना विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शैलेश देठे, अजय कुमार आणि प्रभारी, सहअभ्यासक्रम उपक्रम राबविणारे विशाल यादव व नेहा दिघे यांनी मोठा सहभाग घेऊन या विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचा वाटा उचलला असल्याचे डॉ.पद्मिनी कृष्णा यांनी सांगितले.
सहभागी विद्यार्थ्यांचे नाव आणि पदक
१) श्रुती जैस्वाल- काटा इव्हेंट – गोल्ड
कुमिते इव्हेंट (फाइट) – ब्राँझ
२) अनिकेत शर्मा- काटा इव्हेंट – सिल्वर
कुमिते इव्हेंट (फाइट)- गोल्ड
३) जाहिरा शेख – काटा इव्हेंट ब्राँझ
कुमिते स्पर्धा (लढाई) – सिल्वर
४) शाहिन खान – काटा इव्हेंट – गोल्ड
कुमिते स्पर्धा (लढाई) – गोल्ड
५) सुलतान काझी – काटा इव्हेंट – ब्राँझ
कुमिते इव्हेंट (लढाई) – ब्राँझ
