महाराष्ट्राचे ‘डेथ वॉरंट’ काढलंय

राज ठाकरेंचा भाजपावर घणाघात

मुंबई : भाजपाकडून महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंयअसा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भाजपावर केलाय. दैनिक सामनासाठी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे  यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी मूळ मुंबईकर‘ ही संकल्पना मांडत मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजेहे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघताशहर बघता नातुम्हाला समजणारच नाहीत की तिथले प्रश्न काय आहेत ते. उदाहरणार्थ समजातुमचा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी हे जेव्हा बाहेरचे असतातते जेव्हा मुंबईत येताततेव्हा त्यांना प्रश्न पडतो कीसाला प्रॉब्लेम काय आहे या शहराचारस्ते आहेतहॉस्पिटल आहेतदिवे आहेतशाळा आहेतकॉलेजेस आहेतपाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेतकारण तो कम्पॅरिजन करतो त्याच्या रस्त्यांशीत्याच्या लोड लोडिंगशीत्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे यावर सगळं अवलंबून आहेअसे राज ठाकरे यांनी म्हटले.
उत्तर भारतातून महाराष्ट्रात रोज ५६ ट्रेन येतात,
महाराष्ट्रातील स्थिती आज गंभीर झालीय. जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येताततेवढे आधी येत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर उत्तरेतून जवळपास रोज ५६ ट्रेन महाराष्ट्रात येतात. भरून येतात आणि रिकाम्या जातात. ठाणे जिल्हा पहा. हा जगातला एकमेव असा जिल्हा आहेजिथे  ते  महानगरपालिका आहेत. ठाणेनवी मुंबईकल्याण-डोंबिवलीयांचा डोलारा फक्त मोदींवर अवलंबून आहे! भिवंडीत्यात पालघर जिल्हा वेगळा पकडू नका. वसई-विरारमीरा-भाईंदर… म्हणजे जवळपास  ते   महापालिका आहेत. याची सुरुवात होते ग्रामपंचायतपंचायतनगरपंचायतजिल्हा परिषदनगरपालिकामहापालिका… लोकसंख्येनुसार हे स्वरूप बदलत जाते. आज मुंबईत एक महानगरपालिका आहेपुण्यात दोन आहेत. ठाणे जिल्ह्यात ते 9  महानगरपालिका. याचं कारण काययाचं कारण बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंययाकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *