आज कळवा-मुंब्र्यात सुप्रिया सुळेंची तोफ धडाडणार – मनोज प्रधान
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून शनिवारी, १० जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची तोफ कळवा- मुंब्र्यात धडाडणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कळव्यातील उमेदवार प्रकाश पाटील, सपना पाटील, अभिजीत पवार, तुळशीराम साळवे,  पुजा शिंदे – विचारे,  प्रकाश बर्डे, वर्षा मोरे, रिटा यादव, रेखा यादव, वैशाली खारकर,  सुषमा पाटील, अक्षय ठाकूर,  सुशांत सुर्यराव आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत प्रमिला केणी यांच्या प्रचारार्थ कळवा पारसिक नगर येथील ९० फूट रोडवर येथे शनिवारी,१० जानेवारी रोजी, रात्रौ ८ वाजता सुप्रिया सुळे आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची सभा होणार आहे. दरम्यान, रात्रौ नऊ वाजता मुंब्रा येथे मनिषा भगत, दिपाली भगत, यासीन कुरेशी, अखलाख कुरेशी,  मयुरी म्हात्रे, हाजरा शेख, हिरा पाटील, नाझिमा अन्सारी,  रूमाना शेख, शेख तब्बसुम,  सिराज डोंगरे,  महेंद्र कौमुर्लेकर,  दिव्या गोटे,  पल्लवी जगताप, सुधीर भगत, शाकीर शेख, मर्जिया पठाण, सीमा दाते, अशरफ पठाण, मोहम्मद जैद खांचे , सलमा अन्सारी,  नादिरा सुरमे, समीर शमीम खान यांच्या प्रचार सभेत सुप्रिया सुळे आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड हे मार्गदर्शन करणार आहेत, असे मनोज प्रधान यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *