नवी मुंबई : 22 एप्रिल या ‘वसुंधरा दिवस’ (Earth Day) निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धक विविध उपक्रम राबविण्यात आले.

या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे, परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे व बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल  यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात टी. एस. चाणक्य सागरी किनाऱ्यापाठीमागील भागात नवी मुंबई महानगरपालिका व टी एस चाणक्य युनिव्हर्सिटीचे  विद्यार्थी यांनी संयुक्तपणे स्वच्छता मोहीम हाती घेऊन किनाऱ्याची स्वच्छता केली.

या मोहिमेत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, साफसफाई कर्मचारी व टी एस चाणक्याचे विद्यार्थी सहभागी होते. यावेळी उपस्थितांना जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची माहिती सांगण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाची माझी वसुंधरा शपथ सामुहिकरित्या घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *