शहाबाज पटेल यांना निवडून येण्याचा ठाम विश्वास
प्रभाग ३-ड मधून राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर पटेल लढवताहेत निवडणूक
राज भंडारी
पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३-ड मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शहाबाज पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर व येथील जनतेचा मिळत असलेला प्रचंड उत्साह पाहून आपला विजय निश्चित असल्यासाजे शहाबाज पटेल यांनी सांगितले. प्रचारादरम्यान येथील नागरिकांना स्थानिक माजी नगरसेवकाचे नावही माहित नसल्यामुळे त्यांनी कोणतेही विकासात्मक काम केले नसल्याचे शहाबाज पटेल यांनी अधोरेखित केले. या प्रभागात मराठी, हिंदी, मुस्लिम तसेच बहुभाषिक मतदार असल्याने आपण प्रचंड बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास शहाबाज पटेल यांनी व्यक्त केला.
