महिला लीगच्या उद्घाटनीय सामन्यास ७५० शिक्षकांची  उपस्थिती
डॉ विशाल कडणे यांच्या माध्यमातून क्रीडा प्रेमी शिक्षकांसाठी ७५० तिकिटांची मोफत भेट
मुंबई : मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आणि मंडळाचे प्रमुख डॉ. विशाल कडणे यांच्या पुढाकाराने खरेदी केलेल्या तिकिटामधून, मुंबईतील क्रिकेटप्रेमी शिक्षकांसाठी महिला प्रीमिअर लीग २०२६ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या बहुचर्चित उद्घाटन सामन्याची मोफत तिकिटे देण्यासाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्यमातून निवड झालेल्या ७५० क्रीडा प्रेमी शिक्षकांना सदर सामन्यास मोफत उपस्थिती लावण्याचे भाग्य प्राप्त होणार आहे
या उपक्रमास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षकांसाठी हा अनोखा क्रीडा अनुभव साकारता आला.  लकी ड्रॉचा निकाल ५ जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता, निवड झालेल्या ७५० भाग्यवान शिक्षकांना कळविण्यात आले आहे.
या ५७ व्या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किरण शेलार व आचार्य पवन त्रिपाठी यांनीही शिक्षकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले. विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, मंडळाच्या वतीने अशा प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *