गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
कल्याण : गंधर्व गुरुकुलचा नेत्र दीपक आठवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन व नाट्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.  प्रत्येक सादरीकरणातून शिक्षकांनी मुलांवर घेतलेली मेहनत आणि तितक्याच तन्मयतेने विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आणि रियाज याचा प्रत्यय सर्वांना आला.  ‘श्रीराम’ हा विषय घेऊन सादर करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात श्रीराम हा धर्म नाही तर जीवनाच्या दृष्टिकोन आहे आणि ह्या नामाच्या जपाने होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे पालक आणि मुलांपर्यंत पोहोचवण्यात गंधर्व गुरुकुल यशस्वी झाले.
गजानन पंडीत गुरुजी यांच्या वैदिक मंत्रोच्चारात झालेली कार्यक्रमाची सुरुवात, डॉ प्रमोद नांदगावकर यांनी मोजक्या व मुद्देसूद शब्दात सादर केलेली गंधर्व गुरुकुलाची वाटचाल, प्रभू रामचंद्रांचा प्रेरणात्मक विषय घेऊन गंधर्व गुरुकुल शिक्षिका पूर्वा शिंपी यांचे मुद्देसूद व लाघवी सूत्रसंचालन, बैठक व्यवस्था, गायन, हार्मोनियम, कीबोर्ड, भरतनाट्यम, कथ्थक, वेस्टन डान्स, बासरी, तबला याचे लाईव्ह परफॉर्मन्स आणि त्याला लाभलेली  वादकांची उत्तम साथ लाभली.
विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. पालकांनीही कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्नेहसंमेलनामुळे सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला, अशी आणि अशाच अनेक प्रेरणादायी पोहच पावत्या पालकांनी दिल्या.  या कार्यक्रमाला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रविंद्र घोडविंदे, पाटील, जोशी, शीला नांदगावकर, सुधा जानविलकर, खिसमतराव, संदीप रेडकर, शीतल रेडकर, नितीन नांदगावकर, भूमी नांदगावकर, डॉ सचिन सातपुते, सन्नी नागदेव, डॉ सिद्वेश्वर चामनारू, ऍड. विलास भारती, तुषार शिंपी, दामोदर धोरडे महाराज, प्रशांत दीक्षित, विवेकानंद झरे, प्रवीण वाणी, मुकुंद नावकर, अमर धनावडे अशा अनेक मान्यवर आणि मित्रमंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत मुलांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक मयूर सावर्डेकर, सिद्धी सावर्डेकर, ओमकार लवांदे, प्रशांत सावंत, सुनील गोडांबे, कोमल गायकवाड पाटील, कोमल नागावेकर जाधव, अनंता तरणे, पराग वाणी आणि पालकांचे आभार मानून गंधर्व गुरुकुलच्या संचालिका वैदेही नांदगावकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *