मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद
अवैध धंद्यांना गुन्हेगारी घालते साद.
राजीव चंदने
मुरबाड: गावातील वाद गावातच मिटला जावा आणि गाव शांततेकडुन समृद्धीकडे कसा जाईल यासाठी शासनाने तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली होती.त्यासाठी मुरबाड तालुक्यात सुमारे २०६ गावतील १२५ ग्रामपंचायत मध्ये तंटामुक्त गाव समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु त्या समित्या सद्य परिस्थितीत अस्तित्वात नसल्याने गावात अवैध धंद्यांना उधान आले असुन त्यामुळे गुन्हेगारी वाढत असुन विविध प्रकारच्या घटना घडत आहेत.
सन २००५ ते २०१० चे दरम्यान ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण व्हावे व गावची समृध्दीकडे वाटचाल व्हावी यासाठी राज्याचे तात्कालिक गृहमंत्री आर.आर.पाटील.यांनी प्रत्येक गावात होणारे छोटेमोठे तंटे तेथेच मिळावेत यासाठी तंटामुक्त गाव कमिट्या स्थापन केल्या. गावात छोटे मोठे होणारे वाद हे न्याय निवाडा यासाठी तंटामुक्त कमिटी कडे यायचे आणि त्यांचे मुळ कारण शोधून दोषींवर गावपातळीवर दंडात्मक कारवाई करुन तो मिटविला जात होता.जो ऐकत नसेल तो वाद पोलिस ठाण्यात जात होता.आणि तंटामुक्त कमिटीचे निर्णयावरुन पुढील कारवाई केली जात होती. कमिटी चे कामावरून गावाला उत्तेजनार्थ बक्षीस दिले जात होते. अशा प्रमाणे मुरबाड तालुक्यातील कान्होळ,भुवन.नढई ,सासणे,या गावांना शासनाकडून तंटामुक्त कमिटीचे उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते आणि ती रक्कम गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी वापरली जात होती.मात्र या तंटामुक्त कमिट्या सद्य परिस्थितीत लयास गेल्याने गावात जुगाराचे ,पाकोळी,सट्ट्याचे आड्डे व देशी,गावठी ची तसेच गुटख्याची विक्री खुलेआम होत असल्याने छोटे मोठे वाद होत असल्याने शांततेकडुन समृद्धीकडे वाटचाल करणारे गाव  एक प्रकारे गुन्हेगारीला साद घालत असल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे.
कोट
गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे ग्रामस्थांचे काम आहे.त्यासाठी गाव पातळीवर तंटामुक्त कमिट्या स्थापन केल्या जातात.त्यांचा आणि पोलिस स्टेशनचा काहीही संबंध नाही -दादासाहेब एडके.वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरबाड.
कोट
कोणतीही तक्रारीचे निवारण करणे हे पोलिसांची जबाबदारी आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील तंटामुक्त कमिट्यांशी पोलिसांचा समन्वय असणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी किती तंटामुक्त कमिट्या अस्तित्वात आहेत.याचा लेखाजोखा पोलिस ठाण्यात ठेवणे आवश्यक आहे -अभिजीत देशमुख.तहसिलदार मुरबाड.
कोट
आमच्या गावात झालेल्या वादाचे कारण आम्ही शोधतो.आणि दोघांमध्ये समेट घडवून आणतो व तो वाद तेथे मिटविला जातो.जर एखादा तक्रार दार परस्पर पोलिस ठाण्यात गेला तर त्यावर पोलिस कारवाई करतात.-शाम थोरात. (तंटामुक्त अध्यक्ष, नढई, मुरबाड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *