कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा
कल्याण:  पु.ल. कट्टा कल्याण ही साहित्य, सांस्कृतिक, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून सदर संस्थेच्या वतीने विविध साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असतात. २०२५-२०२६ हे वर्ष  कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून पु.ल. कट्ट्याने कवीवर्य नारायण सुर्वे यांना अभिवादन करण्याकरिता विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कोणत्याही एका कवितेवर आधारित रिल स्पर्धा.
ही रिल स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धकांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कोणत्याही एका कवितेवर आधारित चित्रीकरण करुन कवितेच्या ऑडिओसह  ६० ते १२० सेकंद कालावधीचा चांगल्या ध्वनी गुणवत्तेसह उभ्या स्वरूपात रिल बनवून व्हिडिओ आपल्या स्वतःच्या ड्राइव्हवर अपलोड करुन त्याची लिंक pulkatta२०@gimail.com या ईमेलवर  दि ३० जानेवारी २०२६ पर्यंत   पाठवावा असे आवाहन पु. ल. कट्टा संयोजक प्रा. महेंद्र भावसार यांनी केले आहे.  विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक व प्रशस्तीपत्रक  देऊन गौरविण्यात येणार असून  पारितोषिक प्राप्त व निवडक रिल जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रमात दाखवण्यात येतील. अधिक माहितीसाठी ९८७०३२६६८८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *