कल्याण पूर्वेत जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती
कल्याण: महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात असून विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे. अशातच कल्याण पूर्वेतील जेष्ठ नागरिक सेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृती अभियान फेरी काढण्यात आली. या फेरीला संस्थेच्या कार्यलयापासून सुरवात होऊन ड प्रभाग समिती कार्यालयामार्गे तिसगाव नाका, म्हसोबा चौक ते संस्थेचे कार्यलय कोळसेवाडी येथे सांगता झाली. या अभियानास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले होते.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कालिदास कदम सचिव डी. आर. उंरकर, उपाध्यक्ष दुधराम सहारे, बाळसाहेब बागुल, कार्याध्यक्ष प्रकाश देसाई, खजिनदार केशव जाधव, सहसचिव वासुदेव वाडे, संस्थापक एम. जी. कवडे, के. एल. वासनकर, शशिकांत आंबेरकर आदींनी परिश्रम घेतले. तर या अभियानास केडीएमसीचे अधिकारी विजय सरकटे यांचे सहकार्य लाभले.
