ठाणे मनपा निवडणुकीत धडक कामगार युनियन महासंघाचा भाजप महायुतीला जाहीर पाठिंबा
ठाणे, ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत राणे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहराच्या विकासासाठी, कामगारांचे हित आणि सक्षम प्रशासनासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीने उभ्या केलेल्या ठाण्यातील सर्व अधिकृत उमेदवारांना धडक कामगार युनियन महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्याबाबतचे पत्र अभिजीत राणे यांनी भाजपकडे सुपुर्द केले.
धडक कामगार युनियन ही संघटना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत असून, आजघडीला ७ लाखांहून अधिक सभासदांचा गजबूत संघटित परिवार आहे. कामगारांचे हक्क, रोजगाराची सुरक्षितता, सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास या मूल्यांवर युनियनचा ठाम विश्वास आहे. भाजपाचे विकासाभिमुख धोरण, पारदर्शक प्रशासनाची भूमिका तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास अभिजीत राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या ठाणे महापालिका निवडणुकीत धडक कामगार युनियन महासंघाचे सर्व सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीच्या विजयासाठी संघटितपणे प्रचार व मतदान करतील, अशी ठाम ग्वाही अभिजीत राणे यांनी दिली असुन पाठींब्याचे पत्र भाजपा अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा, कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *