मुंबई : राज्यात २९ महापालिका क्षेत्राती तळीरामांसाठी वाईट बातमी आहे. गुलाबी थंडीत गसा गरम करण्याचे त्यांचे मनसुब निवडणूक आयोगाने उधळले आहेत. महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार १३ जानेवारीला संपणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांकडून कुठलीही आमिष दिले जाऊ नये या हेतुने राज्यात १३ ते १६ जानेवारी या चार दिवसांच्या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत, तिथे ड्राय डे लागू करण्यात आला आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावताच मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात ड्राय डे असणार आहे. जिथे जिथे निवडणुका आहेत, तिथे दारूची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यात २९ महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. यात मुंबईपुणेठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर महानगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस या महानगरपालिकांच्या हद्दीत ड्राय डे लागू असेल.

निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मद्यपानाला बंदी घातल्याने मतदानावेळी मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल. निवडणूकसंबंधी गैरप्रकार, गोंधळ, दंगल टाळता येईल. तसेच मतदारांना आमिष म्हणून मद्य देण्याच्या घटनाही घडल्याचे दिसून आले होते. तसे प्रकार टाळण्यासाठी या चार दिवसांत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात दुकानदारांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *